सोसायटी मासिक आकार - सद्यस्थिती व पुनर्विचार
टागोर नगर अमरज्योती को ऑप हा सो लिमिटेड
बिल्डिंग क्र. २७, टागोर नगर, विक्रोळी (पूर्व)
मुंबई ४०००८३
02 सप्टेंबर २०१८
सोसायटी मासिक आकार - सद्यस्थिती व पुनर्विचार
सध्या सोसायटी प्रत्येक सदस्याकडून दरमहा रु. ४००/- ते रु. ८००/- एवढा मासिक आकार घेते. या दराने सोसायटीला वार्षिक रु. २. ११ लाख एवढी रक्कम मिळणे अपेक्षित आहे.
सोसायटीच्या पूर्वीच्या हिशेबाच्या पद्धतीने २०१८-१९ या वर्षात मागील तीन वर्षांच्या सरासरीने रु. २.६२ लाख एवढा खर्च अपेक्षित आहे.
वरील जमा-खर्चामध्ये साधारणतः रु. ०.५१ लाख एवढी तूट आहे. या व्यतिरिक्त सोसायटी बिल्डिंगचा पुनर्विकासासाठीचा अपेक्षित खर्च यामध्ये अंतर्भूत नाही.
ही तूट भरून काढणे, बॅलन्स शीट नुसार वेगवेगळ्या निधींची (फंड) रक्कम वेगळी राखून ठेवणे व सोसायटी बिल्डींगच्या पुनर्विकासाचा विचार करणे यासाठी सोसायटी मासिक आकार वाढवण्याचा प्रस्ताव सर्व सदस्यांना सादर करत आहे.
या प्रस्तावामध्ये काही चुका / त्रुटी राहून गेल्या असण्याची शक्यता आहे. अशा चुका / त्रुटी आपल्या निदर्शनास आल्यास जरूर कळवा म्हणजे त्यांची वेळीच दुरुस्ती करणे शक्य होईल. यामधील कोणत्याही मुद्द्यावर आपल्याला स्पष्टीकरण हवे असल्यासही त्यासाठी आगाऊ कळवा.
वरील विषय सोसायटीच्या येत्या ए.जी.एम. मध्ये आपल्या संमती साठी मांडण्याचा विचार आहे. तरी सर्व सदस्यांनी यावर विचार करून आपले मत खालील कॉमेन्ट बॉक्स मध्ये जरूर कळवावे.
या विषयीचा कोणताही निर्णय सभेमध्ये सर्वांच्या अनुमतीनेच घेतला जाईल.
धन्यवाद.
*********************************************************************************

टीप :
दिनांक २३ सप्टेंबर २०१८ रोजी झालेल्या वार्षिक सर्व साधारण सभेत ठरल्याप्रमाणे वरील मासिक आकारातील सुधारणा व त्यावरील लेट फी सध्या स्थगित ठेवण्यात आली आहे. इमारत जर पुनर्विकासासाठी बिल्डरकडे द्यावयाची असल्यास अथवा इतर कोणताही मार्ग पत्करल्यास मासिक आकार वाढवण्याची सध्या जरूरी नाही असे सर्व सदस्यांनी ठरवले.
**************************************************************************************************

लेट फी बाबत सुचना
देयक देण्यासाठी दिरंगाई (लेट) केल्यास मूळ रकमेवर २१% प्रति वार्षिक या दराने खालील प्रमाणे व्याज आकारणी केली जाईल (Sec ७१).
महिना
|
मेन्टेनन्स आकार (रु.)
|
थकबाकी (रु.)
|
थकबाकी वरील व्याज 21%
|
एकूण
|
प्रथम
|
७००
|
०
|
०
|
आपण देयक दिले नाही
|
दुसरा
|
७००
|
७००
|
१२
|
चालू महिन्याचे रु. ७०० + थकबाकी रु. ७०० + थकबाकीवरील व्याज रु. १२ = एकूण १४१२
|
तिसरा
|
७००
|
१४००
|
२४
|
चालू महिन्याचे रु. ७०० + थकबाकी रु. १४०० + थकबाकीवरील व्याज रु.
२४ = एकूण २१२४
|
या प्रमाणे पुढील महिन्यांसाठी गणना केली जाईल. रिपेअर फंड व नॉन ऑक्युपन्सीवर व्याज नाही. मात्र हे दोन्ही आकार एकाच वेळी घेण्यात येतील.
|
||||
*********************************************************************************
टीप :
दिनांक २३ सप्टेंबर २०१८ रोजी झालेल्या वार्षिक सर्व साधारण सभेत ठरल्याप्रमाणे वरील मासिक आकारातील सुधारणा व त्यावरील लेट फी सध्या स्थगित ठेवण्यात आली आहे. इमारत जर पुनर्विकासासाठी बिल्डरकडे द्यावयाची असल्यास अथवा इतर कोणताही मार्ग पत्करल्यास मासिक आकार वाढवण्याची सध्या जरूरी नाही असे सर्व सदस्यांनी ठरवले.
आपल्याला हा ब्लॉग आवडल्यास जरूर लाईक बटण दाबा. आपले विचार, प्रतिक्रिया व सुचना कळवण्यासाठी खाली कॉमेंट बॉक्समध्ये मध्ये लिहा.
**************************************************************************************************
अस्वीकरण (Disclaimer):
या ब्लॉगद्वारे संस्थेची कमिटी प्रामाणिकपणे आपल्या सुविधेसाठी अथवा माहितीसाठी विविध प्रकारची माहिती पुरवण्याचा प्रयत्न करत राहील. यामध्ये संस्थेमध्ये झालेल्या अथवा होणाऱ्या घडामोडी, विविध कायदे, संस्थेच्या कार्यक्षेत्राशी निगडित वर्तमानपत्रातील बातम्या, सदस्यांना नेहमी लागणारे फॉर्म्स, संस्थेचे अहवाल, कागदपत्रे इत्यादीचा समावेश असेल. मात्र ही माहिती वेगवेगळ्या माध्यमातून येत असल्याने तसेच कायदे व शासकीय फॉर्म्स हे वेळोवेळी बदलत असल्याने या माहितीची सत्यासत्यता, कायदेशीरपणा अथवा ताजेपणा पडताळून पाहण्याची संपूर्ण जबाबदारी सदस्याची / माहितीचा वापरकर्त्याची असेल. सदर माहितीच्या आधारे कोणताही निर्णय घेऊन किंवा कृती करून कोणत्याही सदस्याला अथवा इतर व्यक्तीला कोणत्याही प्रकारचा तोटा अथवा नुकसान तसेच शारीरिक अथवा मानसिक त्रास अथवा इतर कोणत्याही प्रकारची हानी झाल्यास सोसायटी, संबांधित कार्यकारी मंडळ अथवा संस्थेचा कोणताही कार्यकर्ता जबाबदार असणार नाही याची प्रत्येक सदस्याने नोंद घ्यावी. या ब्लॉग वरील माहितीशी सोसायटीचे कार्यकारी मंडळ सहमत असेलच असे नाही.
हा ब्लॉग फक्त टागोर नगर अमरज्योती को ऑप हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, बिल्डिंग क्र. २७, टागोर नगर, विक्रोळी (पूर्व), मुंबई ४०००८३ या संस्थेच्या सदस्यांच्या अंतर्गत / खाजगी माहितीसाठी मर्यादित असून यामध्ये कोणतीही माहिती विकण्याचा अथवा व्यावसायिक नफा कमावण्याचा उद्देश नाही.

Comments
Post a Comment