स्वागत



टागोर नगर 

अमरज्योती को ऑप हा सो लिमिटेड 

नोंदणी क्र. बीओएम / (डब्ल्यू-एन) / एचएसजी (ओएच) / १३११ / ८३-८४

बिल्डिंग क्र. २७, टागोर नगर, विक्रोळी (पूर्व)
मुंबई ४०००८३
ई-मेल: amarjyotivikhroli@gmail.com






२३ ऑगस्ट २०१८

सर्व सदस्य,

टागोर नगर अमरज्योती को ऑप हा सो लिमिटेडच्या ब्लॉग पेज वर आपले स्वागत आहे.  

आपल्याला या माध्यमातून सोसायटीच्या कार्याची नियमित माहिती करून द्यावी व त्याबद्दलचे आपले विचार व सूचना जाणून घ्याव्यात यासाठी आम्ही हा ब्लॉग चालू करत आहोत.

हा ब्लॉग फक्त सोसायटी सदस्यांसाठी मर्यादित आहे. 

यामुळे सर्वांमध्ये सुसंवाद साधला जावा हीच अपेक्षा. 

धन्यवाद. 

आपले

कार्यकारी मंडळ

सौ. मधुरा ज्ञानेश्वर जोशी, अध्यक्ष

सौ. नंदा नारायण कलोते, सचिव


सौ. स्नेहल गजानन परब, सदस्य

श्री. ज्ञानेश्वर दत्तात्रय जोशी, सदस्य

श्री. संतोष बापूजी कासकर, सदस्य

श्री. दयानंद संजीवा शेट्टी, सदस्य

श्री. रवींद्र वसंत वेतुरकर, सदस्य व अंतर्गत लेखापरीक्षक


श्री. विलास धाकू यादव, सदस्य






*********************************************************************************
अस्वीकरण (Disclaimer):

या ब्लॉगद्वारे संस्थेची कमिटी प्रामाणिकपणे आपल्या सुविधेसाठी अथवा माहितीसाठी विविध प्रकारची माहिती पुरवण्याचा प्रयत्न करत राहील.  यामध्ये संस्थेमध्ये झालेल्या अथवा होणाऱ्या घडामोडी, विविध कायदे, संस्थेच्या कार्यक्षेत्राशी निगडित वर्तमानपत्रातील बातम्या, सदस्यांना नेहमी लागणारे फॉर्म्स, संस्थेचे अहवाल, कागदपत्रे   इत्यादीचा समावेश असेल.  मात्र ही माहिती वेगवेगळ्या माध्यमातून येत असल्याने तसेच कायदे व शासकीय फॉर्म्स हे वेळोवेळी बदलत असल्याने या माहितीची सत्यासत्यता, कायदेशीरपणा अथवा ताजेपणा पडताळून पाहण्याची संपूर्ण जबाबदारी सदस्याची / माहितीचा वापरकर्त्याची असेल.  सदर माहितीच्या आधारे कोणताही निर्णय घेऊन किंवा कृती करून कोणत्याही सदस्याला अथवा इतर व्यक्तीला कोणत्याही प्रकारचा तोटा अथवा नुकसान तसेच शारीरिक अथवा मानसिक त्रास अथवा इतर कोणत्याही प्रकारची हानी झाल्यास सोसायटी, संबांधित कार्यकारी मंडळ अथवा संस्थेचा कोणताही कार्यकर्ता जबाबदार असणार नाही याची प्रत्येक सदस्याने नोंद घ्यावी.  या ब्लॉग वरील माहितीशी सोसायटीचे कार्यकारी मंडळ सहमत असेलच असे नाही.  

हा ब्लॉग फक्त टागोर नगर अमरज्योती को ऑप हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, बिल्डिंग क्र. २७, टागोर नगर, विक्रोळी (पूर्व), मुंबई ४०००८३ या संस्थेच्या सदस्यांच्या अंतर्गत / खाजगी माहितीसाठी मर्यादित असून यामध्ये कोणतीही माहिती विकण्याचा अथवा व्यावसायिक नफा कमावण्याचा उद्देश नाही. 

*********************************************************************************

आपल्याला हा ब्लॉग आवडल्यास जरूर लाईक बटण दाबा.  आपले विचार, प्रतिक्रिया व सुचना कळवण्यासाठी खाली कॉमेंट बॉक्समध्ये मध्ये लिहा.  


This blog is created, managed and updated by
 

Last updated on 31st December 2020



Comments

Popular posts from this blog

सोसायटी फॉर्म्स

New Update