कमिटीच्या कार्याचा अहवाल २०१७-१८


टागोर नगर 


अमरज्योती को ऑप हा सो लिमिटेड 


नोंदणी क्र. बीओएम / (डब्ल्यू-एन) / एचएसजी (ओएच) / १३११ / ८३-८४

बिल्डिंग क्र. २७, टागोर नगर, विक्रोळी (पूर्व)
मुंबई ४०००८३
ई-मेल: amarjyotivikhroli@gmail.com



३१ ऑगस्ट २०१८

कमिटीच्या कार्याचा अहवाल २०१७-१८


) सोसायटीमधील सर्व कागदपत्रांची छाननी वर्गवारी करून ते व्यवस्थित फाईल केलेयामध्ये प्रत्येक सदस्याची अथवा विषयाची एक स्वतंत्र फाईल बनवण्यात आली असून आता गरजेनुसार पेपर्स मिळणे सुलभ झाले आहेज्या सदस्यांच्या फाईल मध्ये पेपर्स नव्हते त्यांच्या कडून ते घेऊन फाईल पूर्ण करण्याचा प्रयत्न केला गेलायासाठी सोसायटी मधील सर्व सदस्यांनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेऊन मदत केली.

) शक्य तेवढ्या संस्थेच्या कागदपत्रांचे डिजिटल फॉरमॅट मध्येही जतन करण्यात आलेले आहे

) सोसायटी मेन्टेनन्स रजिस्टर ऑन लाईन करण्यात आले - आता सदस्य त्यांची मेन्टेनन्सची भरलेली  बाकी रक्कम, भरलेल्या रकमेची पावती इत्यादी माहिती लिंक वर केव्हाही पाहू शकतात.

) या वर्षी पासून सदस्यांच्या सोयीसाठी सोसाटीचा मेन्टेनन्स  एन..एफ.टी.  द्वारे भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.  आता कोणताही सदस्य खालील अकाउंटवर आपला मासिक आकार भरू शकतो. 



) संस्थेचे हिशेब डिजिटल करण्यात आलेले आहेतप्रत्येक महिन्याचे हिशेब अध्यक्ष, सचिव खजिनदार यांच्या सहीने कायम केले जातातयानंतर त्यांचे अंतर्गत हिशेब तपासनीस ऑडिट करतात असे ऑडिट केलेले हिशेब दर महिन्याच्या कमिटी मीटिंग मध्ये सादर करून मंजूर केले जातात

) प्रत्येक खर्चाच्या व्हाउचरवर अध्यक्ष, सचिव खजिनदार यापैकी दोघांच्या मंजुरीच्या सह्या घेतल्या जातात.  रुपये १५००/- च्या वरील सर्व खर्चांसाठी क्रॉस अकाउंट पेयी चेकद्वारेच पेमेंट दिले जाते

) आपली सोसायटी म्हाडाचे देयक नियमित भरत असून सप्टेंबर २०१८ पर्यंतचे चार्जेस आपण भरलेले आहेत.



) बी.एम.सी. टॅक्स सुद्धा मार्च २०१९ पर्यंत भरलेला आहे. 

) सोसायटीने सदस्यांचे नॉमिनेशन फॉर्म्स भरून घेतले आहेतज्या सदस्यांनी ते दिले नसतील त्यांनी ते त्वरित भरून द्यावेत ही विनंती

१०) सदस्यांच्या सोयीसाठी याच ब्लॉगवर अन्यत्र (सदस्यांना सोसायटीकडून लागणारे दस्तऐवज) आपल्या नेहमीच्या गरजेचे फॉर्म्स ऑन-लाईन उपलब्ध करून देण्यात आले आहेतया सुविधेमुळे सदस्य, त्यांना हवे असलेले फॉर्म्स डाउनलोड करून त्याची प्रिंट आवश्यक त्या अर्जासोबत सोसाटीला देऊ शकतातयामुळे सोसायटीकडून हवी असलेली कागदपत्रे आपणास त्वरित विनासायास मिळण्यास मदत होईल

११) यावर्षीच सोसायटीने नवीन पॅन नंबर घेतला आहे

१२) सोसायटीने ' मुंबई डिस्ट्रिक्ट को ऑप हौसिंग फेडरेशन लीमिटेड' चेही सदस्यत्व घेतले आहे.


१३) नवीन रेकॉर्डस् मध्ये नॉमिनेशन रजिस्टर, 'आय' रजिस्टर, 'जे' रजिस्टर इत्यादी रजिस्टर्स बनवली आहेत

१४) म्हाडाकडून ज्या सदस्यांच्या नावावर अद्याप सदनिका झालेली नाही अथवा त्यांनी ती करून घेतली नाही अशा सदस्यांसाठी सोसायटीने एक मार्गदर्शन सत्र आयोजित केले होते.

१५) आपल्या सोसायटीचे इलेक्ट्रिसिटी कनेक्शन अद्याप सोसायटीच्या नावावर नव्हतेयावर्षी ते सोसायटीच्या नावावर करून घेण्यात आले.

१६) इमारतीच्या मागील भागात लाईटची सोय करण्यात आली

१७) सोसायटी कन्व्हेयन्स साठी प्रयत्न करण्यात आलेम्हाडा परत एकदा थकबाकी भरण्यासाठी सांगत असल्याने पुढील प्रयत्न थांबवण्यात आले आहेतया बद्दलचा निर्णय सोसायटीच्या . जी. एम. मध्ये मांडून सर्वानुमते निर्णय घेण्यात येईल.

१८) कन्व्हेयन्स बरोबरच सोसायटीने पुनर्विकासासाठी प्रयत्न चालू केलेले असून त्याबद्दलची माहिती याच ब्लॉग वर 'पुनर्विकास - ठराविक प्रोपोजलमधील काही निवडक पानेया ब्लॉगवर दिलेली आहेसदस्यांनीही त्यांना माहित असलेल्या / उत्सुक असलेल्या पुनर्विकासकाचा संदर्भ देऊन यामध्ये सहकार्य करावे.  हा मुद्दाही सोसायटीच्या . जी. एम. मध्ये मांडून सर्वांचे मत घेऊन त्यावर निर्णय घेण्यात येईल

१९) सदस्यांनी पुढाकार घेतल्यास आपल्याला स्वयंपुनर्विकासाचाही विचार करता येऊ शकतोयाबद्दल आपण दोन सल्लागारांची मते घेतली असून सदस्यांनी त्यांची मते त्यांनी सोसायटीला जरूर कळवावीयामधील एक प्रोपोजल 'पुनर्विकास - ठराविक प्रोपोजलमधील काही निवडक पाने' या ब्लॉगवर दिलेले आहे

२०) आपल्या सोसायटीने स्टक्चरल ऑडिट, स्टॅबिलिटी सर्टिफिकेट बिल्डिंगच्या विम्यासाठी कोटेशन्स मागवली होती परंतु हा खर्च (२५ ते ५० लाख) आपल्याकडील जमा असलेल्या रकमेपेक्षा जास्त असल्याने हे तात्पुरते स्थगित ठेवण्यात आलेले आहे.  या बद्दलचा निर्णय सोसायटीच्या . जी. एम. मध्ये मांडून सर्वानुमते निर्णय घेण्यात येईल.

२१) आपण सध्या घेत असलेला मासिक मेन्टेनन्स आकार अपुरा असून तो सर्व कायदेशीर खर्च अथवा तरतुदींसाठी पुरेसा नाहीयाविषयी वेगळ्या ब्लॉगवर माहिती देण्यात आली असून . जी. एम. मध्ये सर्वानुमते निर्णय घेण्यात येईलया ठरावानंतर आपली मेन्टेनन्सची पावती अधिक पद्धतशीररित्या / सोसायटीच्या कायद्यांना अनुसरुन देण्याचा आमचा प्रयत्न राहील

२२) सोसायटी सदस्यांना त्यांचे अधिकार व जबाबदाऱ्या यांची सोप्या पद्धतीने माहिती देऊन सर्वांमध्ये सुसंवाद साधण्याच्या उद्धेशाने आपल्या सोसायटीने काही मार्गदर्शकतत्वे तयार केलेली आहेत.  यासाठी सोसायटी बाय-लॉज, वर्तमान पत्रातील लेख तसेच सदस्यांच्या वैयक्तिक सूचनांचा संदर्भ घेतलेला असून आपण सर्वांनी त्यांना येत्या जीएममध्ये संमती द्यावी ही विनंती.   

(टीप: दिनांक २३ सप्टेंबर २०१८ रोजी सदर मार्गदर्शक तत्वे संस्थेच्या ए.जी.एम. मध्ये मांडून सर्व संमतीने स्वीकृत करण्यात आली)

२३) इमारतीतील अंतर्गत गळतीचा प्रश्न प्राधान्याने सोडवण्याचे प्रयत्न केले गेलेयासाठी बऱ्याच कंत्राटदारांना बोलावून विचार विनिमय केला गेलाकाही गाळ्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर कामही करून घेण्यात आलेपरंतु दुर्दैवाने या कोणत्याही प्रयत्नाला यश मिळाले नाही हा प्रश्न प्रलंबित राहिलाकमिटी अद्यापही गुणवत्तापूर्ण हमी देऊन काम करणाऱ्या कंत्राटदाराच्या शोधात आहेयावर उपाय शोधण्यासाठी सर्व सदस्यांचा सक्रिय सहभाग अपेक्षित आहे

२४) नवीन ब्लॉगस्पॉट ची सुरुवात. 



आपल्याला हा ब्लॉग आवडल्यास जरूर लाईक बटण दाबा.  आपले विचार, प्रतिक्रिया व सुचना कळवण्यासाठी खाली कॉमेंट बॉक्समध्ये मध्ये लिहा.  

**************************************************************************************************
अस्वीकरण (Disclaimer):

या ब्लॉगद्वारे संस्थेची कमिटी प्रामाणिकपणे आपल्या सुविधेसाठी अथवा माहितीसाठी विविध प्रकारची माहिती पुरवण्याचा प्रयत्न करत राहील.  यामध्ये संस्थेमध्ये झालेल्या अथवा होणाऱ्या घडामोडी, विविध कायदे, संस्थेच्या कार्यक्षेत्राशी निगडित वर्तमानपत्रातील बातम्या, सदस्यांना नेहमी लागणारे फॉर्म्स, संस्थेचे अहवाल, कागदपत्रे   इत्यादीचा समावेश असेल.  मात्र ही माहिती वेगवेगळ्या माध्यमातून येत असल्याने तसेच कायदे व शासकीय फॉर्म्स हे वेळोवेळी बदलत असल्याने या माहितीची सत्यासत्यता, कायदेशीरपणा अथवा ताजेपणा पडताळून पाहण्याची संपूर्ण जबाबदारी सदस्याची / माहितीचा वापरकर्त्याची असेल.  सदर माहितीच्या आधारे कोणताही निर्णय घेऊन किंवा कृती करून कोणत्याही सदस्याला अथवा इतर व्यक्तीला कोणत्याही प्रकारचा तोटा अथवा नुकसान तसेच शारीरिक अथवा मानसिक त्रास अथवा इतर कोणत्याही प्रकारची हानी झाल्यास सोसायटी, संबांधित कार्यकारी मंडळ अथवा संस्थेचा कोणताही कार्यकर्ता जबाबदार असणार नाही याची प्रत्येक सदस्याने नोंद घ्यावी.  या ब्लॉग वरील माहितीशी सोसायटीचे कार्यकारी मंडळ सहमत असेलच असे नाही.

हा ब्लॉग फक्त टागोर नगर अमरज्योती को ऑप हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, बिल्डिंग क्र. २७, टागोर नगर, विक्रोळी (पूर्व), मुंबई ४०००८३ या संस्थेच्या सदस्यांच्या अंतर्गत / खाजगी माहितीसाठी मर्यादित असून यामध्ये कोणतीही माहिती विकण्याचा अथवा व्यावसायिक नफा कमावण्याचा उद्देश नाही. 

*********************************************************************************
This blog is created, managed and updated by
 

Last updated on 31st December 2020

Comments

Popular posts from this blog

सोसायटी फॉर्म्स

New Update

स्वागत