लेखापरीक्षक व सोसायटीचे वार्षिक अहवाल व इतिवृत्त

टागोर नगर 

अमरज्योती को ऑप हा सो लिमिटेड 

नोंदणी क्र. बीओएम / (डब्ल्यू-एन) / एचएसजी (ओएच) / १३११ / ८३-८४

बिल्डिंग क्र. २७, टागोर नगर, विक्रोळी (पूर्व)
मुंबई ४०००८३
ई-मेल: amarjyotivikhroli@gmail.com



१९ ऑगस्ट २०१९





                                  


वर्ष २०१८-१९ - लेखापरीक्षकांचा अहवाल


वर्ष २०१७-१८ - लेखापरीक्षकांचा अहवाल 




*********************************************************************************

२०१८ - १९ सालच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत झालेल्या चर्चेचा गोषवारा
(हा सभेचा इतिवृत्तांत नाही)

संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक १८ सप्टेंबर २०१९ रोजी सकाळी ११ वाजता संस्थेच्या कार्यालयात घेण्यात आली.

सभा सकाळी ११:३० वाजता सुरुवात झाली. 
सभेचे विषय:
  
१.    सभाध्यक्षांची निवड करणे, सभेचे नोटीस वाचणे - श्री विलास धा. यादव यांनी सभेचे अध्यक्षपद भूषवले.
२.    संस्थेच्या दिवंगत सदस्यांना श्रदांजली देणे - संस्थेचे माजी अध्यक्ष कै. हिरामण भालेराव व सौ. एडना अँथोनी टोरीस यांना श्रद्धांजली देण्यात आली.
 .  मागील सर्वसाधारण सभेचे इतिवृत्तास मंजुरी देणे - सर्व संमतीने मंजुरी देण्यात आली.
 .  २०१८-१९ सालच्या लेखापरीक्षांच्या अहवालास मंजुरी देणे - सर्व संमतीने मंजुरी देण्यात आली.
 .  २०१८-१९ सालचे हिशेब मंजूर करणे - सर्व संमतीने मंजुरी देण्यात आली. 
 .  २०१८-१९ सालच्या कामकाजाचा अहवाल सादर करणे - या वर्षी विशेष कोणतेही काम करण्यात आले नाही.  
 .  इमारतीच्या पुनर्विकासासाठी पुढील निर्णय घेणे -  
       खालील महत्वाचे ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले.
       (१) सर्वानुमते ठराव करण्यात येतो की, अमरज्योती को ऑप हा सोसायटीच्या इमारत क्र. २७ चे कन्व्हेयन्स डीड रजिस्टर्ड करणेसाठी म्हाडामध्ये पाठपुरावा करून प्रक्रिया चालू ठेवण्यात यावी व लवकरात लवकर कन्व्हेयन्स डीड रजिस्टर्ड करण्यात यावे व त्यासाठी जो काही खर्च असेल तो सोसायटीने करावा. 
       (२) सर्वानुमते ठराव करण्यात येतो की, अमरज्योती को ऑप हा सोसायटीच्या इमारत क्र. २७ च्या पुनर्बांधणी संदर्भात शासनाचे परिपत्रकाची सोसायटीला आजतागायत माहिती नसल्याने चुकीच्या पद्धतीने आजतागायत केलेल्या सर्व वास्तुविशारद, पी.एम.सी. व डेव्हलपर्सच्या नियुक्तीसाठी केले गेलेले सर्व ठराव रद्द करण्यात आले आहेत. 
       (३) सर्वानुमते ठराव करण्यात येतो की, अमरज्योती को ऑप हा सोसायटीच्या पुनर्बांधणीचा प्रकल्पाकरिता वास्तुविशारद, पी.एम.सी. व रेरा कन्सल्टन्ट म्हणून दिनांक ०३.०१.२००९ व ०४.०७.२०१९ रोजीच्या शासनाच्या परिपत्रकानुसार सोसायटीने निवड व नियुक्ती करण्याचे ठरले व त्यानुसार कार्यवाही सुरु करण्यासाठी प्रथम एका मराठी व एका इंग्रजी वर्तमानपत्रात जाहिरात देण्याचे ठरले.
       (४) सर्वानुमते ठराव करण्यात येतो की, अमरज्योती को ऑप हा सोसायटीच्या पुनर्बांधणीचा प्रकल्पाकरिता प्रकल्पाच्या सुरुवातीपासून प्रकल्प पूर्ण होईपर्यंत सोसायटीच्या वतीने आवश्यक ते निर्णय घेणे, प्रस्ताव तयार करणे, ते सादर करणे, प्रकल्प पूर्ण होईपर्यंत सोसायटीच्या वतीने आवश्यक त्या सर्व गोष्टी करणे, आवश्यक त्या नेमणूक करणे, करारनामे करणे, व्यवहार करणे, व्यावरहाट वाटाघाटी करणे, आवश्यक ती कागदपत्रे तयार करणे, सोसायटीच्या वतीने आवश्यक त्या कागदपत्रांवर सह्या करणे, निर्णय घेणे, पत्रव्यवहार करणे व सभा घेण्याचे अधिकार सोसायटीच्या पदाधिकारी कमिटी सभासदांस देण्यात येत आहेत.   यासाठी खालील सदस्यांची नावे मंजूर करण्यात आली. 

          - सौ. मधुरा ज्ञानेश्वर जोशी, अध्यक्ष 
          - सौ. नंदा नारायण कलोते, सचिव,
          - सौ. स्नेहल गजानन परब, खजिनदार 
          - श्री. ज्ञानेश्वर दत्तात्रय जोशी, कार्यकारिणी सदस्य
          - श्री. संतोष बापूजी कासकर, कार्यकारिणी सदस्य
          - श्री. दयानंद संजीवा शेट्टी, कार्यकारिणी सदस्य
          - श्री. रवींद्र वंतूरकर, कार्यकारिणी सदस्य व अंतर्गत लेखा परीक्षक 
          - श्री. विलास धाकू यादव, कार्यकारिणी सदस्य
          - श्री आयवन फेलिक्स डिसोजा, रिडेव्हलपमेंट कोअर ग्रुप सदस्य 
          - श्री. नरेंद्र हरिश्चंद्र गायकवाड, रिडेव्हलपमेंट कोअर ग्रुप सदस्य
          - सौ. अरुंधती राणे, रिडेव्हलपमेंट कोअर ग्रुप सदस्य
          - श्री. अमृत पटेल, रिडेव्हलपमेंट कोअर ग्रुप सदस्य
 
 .  सोसायटी मासिक मेन्टेनन्स आकार वाढविण्याबद्दल विचार करणे - इमारतीचा पुनर्विकास करावयाचा असल्याने
      यासाठी तात्पुरती स्थगिती देण्यात आली.
 .  नवीन उपविधी स्वीकृत करण्याबाबत ठराव करणे - इमारतीचा पुनर्विकास करावयाचा असल्याने
      यासाठी तात्पुरती स्थगिती देण्यात आली.
१०.  सोसायटी नियमावली (सदस्यांसाठी मार्गदर्शक तत्वे) - आवश्यक सुधारणा करणे - सोसायटीच्या सार्वजनिक जागेचा तात्पुरता खाजगी वापर - यामध्ये साई पालखी भक्तांना सूट द्यावी असे ठरवण्यात आले.
११.  पुढील वर्षाकरिता प्रमाणित लेखापरीक्षक अंतर्गत हिशेब तपासनीस यांची निवड करणे - श्री सावंत यांची निवड करण्यात आली.
१२.  सभासदांकडून आलेले लेखी ठराव सभेपुढे मांडणे - कोणीही लेखी ठराव दिलेला नाही.
१३.  अध्यक्ष्यांच्या परवानगीने येणारे इतर विषय - इतर कोणताही विषय चर्चेसाठी आला नाही.
१४.  समारोप आभार प्रदर्शन - समारोप प्रसंगी सौ. संयुक्ता कासकर यांचा त्यांच्या ऑफिसमधील मिळालेल्या  बढतीसाठी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.


*********************************************************************************

२०१७ - १८ सालच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत झालेल्या चर्चेचा गोषवारा
(हा सभेचा इतिवृत्तांत नाही)

संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक २३ सप्टेंबर २०१८ रोजी सकाळी ११ वाजता संस्थेच्या कार्यालयात घेण्यात आली.

सभेचे विषय:

१.       सभाध्यक्षांची निवड करणे, सभेचे नोटीस वाचणे - श्री विलास धा. यादव यांनी सभेचे अध्यक्षपद भूषवले.
२.       संस्थेच्या दिवंगत सदस्यांना श्रदांजली देणे - पटेल व राजन यांच्या कुटुंबियांना श्रद्धांजली देण्यात आली.
 ३मागील सर्वसाधारण सभेचे इतिवृत्तास मंजुरी देणे - सर्व संमतीने मंजुरी देण्यात आली
 ४२०१७-१८ सालच्या लेखापरीक्षांच्या अहवालास मंजुरी देणे - सर्व संमतीने मंजुरी देण्यात आली
 ५२०१७-१८ सालचे हिशेब मंजूर करणे - सर्व संमतीने मंजुरी देण्यात आली
 ६२०१७-१८ सालच्या कामकाजाचा अहवाल सादर करणे - संक्षिप्त अहवाल सादर करण्यात आला (तपशील
      www.amarjyotivikhroli.blogspot.com याच ब्लॉगस्पॉटवर इतरत्र उपलब्ध आहे)
 ७संस्थेच्या अभिहस्तांतरणाविषयी विचार विनिमय करणे - वेळेअभावी सविस्तर चर्चा करण्यासाठी
      २ ऑक्टोबर २०१८ रोजी स्पेशल जनरल बॉडी मीटिंग बोलवावी असे ठरले
 ८इमारतीच्या पुनर्विकास / स्वयंपुनर्विकास यावर विचार विनिमय करणे - वरीलप्रमाणे (पॉइंट क्र. ७)
 ९सोसायटी मासिक मेन्टेनन्स आकार वाढविण्याबद्दल विचार करणे - संस्थेचे अभिहस्तांतर, पुनर्विकास
      अथवा स्वयं पुनर्विकास यावर निर्णय घेण्यात येईपर्यंत या विषयाला स्थगिती देण्यात आली.
१०सोसाटीचे इनकम टॅक्स रिटर्न भरण्याविषयी निर्णय घेणे - इनकम टॅक्स रिटर्न भरावे असे ठरवण्यात आले.
११.  इमारतीच्या स्टक्चरल ऑडिट करण्या साठी निर्णय घेणे - इमारतीचा पुनर्विकास करावयाचा असल्याने
      यासाठी तात्पुरती स्थगिती देण्यात आली. 
१२नवीन उपविधी स्वीकृत करण्याबाबत ठराव करणे - नवीन उपविधी स्वीकृत करावे असे ठरले
१३सोसायटी नियमावली (सदस्यांसाठी मार्गदर्शक तत्वे) स्वीकृत करणे - सर्व संमतीने मंजुरी देण्यात आली
१४पुढील वर्षाकरिता प्रमाणित लेखापरीक्षक अंतर्गत हिशेब तपासनीस यांची निवड करणे
       प्रमाणित लेखा परीक्षक - श्री अजय बा लोखंडे
       अंतर्गत लेखा परीक्षक - श्री रवींद्र वसंत वेतुरकर
       यांना मंजुरी देण्यात आली
१५सभासदांकडून आलेले लेखी ठराव सभेपुढे मांडणे - ठराव आले नाहीत
१६अध्यक्ष्यांच्या परवानगीने येणारे इतर विषय -  आपल्या संस्थेच्या हिशेबामध्ये, सदस्य श्रीमती जलजा के
       सुवर्णा यांच्या नावावर रु. २०००/- एवढी रक्कम फार पूर्वीपासून येणे दाखवण्यात येत आहेया बद्दल
       आपल्या मागील कार्यकारिणीला विचारल्यावर ही बाकी रक्कम २००० सालातील बिल्डिंग रिपेअर
       फंडातील असल्याचे सांगण्यात आलेमात्र यावर श्रीमती सुवर्णा यांनी रु. २०००/- च्या संपूर्ण पेमेन्टच्या
       पावत्या दाखवल्यामुळे ही आता ही रक्कम आपल्या हिशेब तपासनीसांना सांगून हिशेबातून काढून
     
 टाकण्याचे सर्व संमतीने ठरले.
       या वेळी श्री कारंडे व् श्री दयानंद शेट्टी यांना त्यांची शेयर सर्टिफिकेट्स देण्यात आली.

१७समारोप आभार प्रदर्शन




आपल्याला हा ब्लॉग आवडल्यास जरूर लाईक बटण दाबा.  आपले विचार, प्रतिक्रिया व सुचना कळवण्यासाठी खाली कॉमेंट बॉक्समध्ये मध्ये लिहा.  
 


*********************************************************************************
अस्वीकरण (Disclaimer):

या ब्लॉगद्वारे संस्थेची कमिटी प्रामाणिकपणे आपल्या सुविधेसाठी अथवा माहितीसाठी विविध प्रकारची माहिती पुरवण्याचा प्रयत्न करत राहील.  यामध्ये संस्थेमध्ये झालेल्या अथवा होणाऱ्या घडामोडी, विविध कायदे, संस्थेच्या कार्यक्षेत्राशी निगडित वर्तमानपत्रातील बातम्या, सदस्यांना नेहमी लागणारे फॉर्म्स, संस्थेचे अहवाल, कागदपत्रे   इत्यादीचा समावेश असेल.  मात्र ही माहिती वेगवेगळ्या माध्यमातून येत असल्याने तसेच कायदे व शासकीय फॉर्म्स हे वेळोवेळी बदलत असल्याने या माहितीची सत्यासत्यता, कायदेशीरपणा अथवा ताजेपणा पडताळून पाहण्याची संपूर्ण जबाबदारी सदस्याची / माहितीचा वापरकर्त्याची असेल.  सदर माहितीच्या आधारे कोणताही निर्णय घेऊन किंवा कृती करून कोणत्याही सदस्याला अथवा इतर व्यक्तीला कोणत्याही प्रकारचा तोटा अथवा नुकसान तसेच शारीरिक अथवा मानसिक त्रास अथवा इतर कोणत्याही प्रकारची हानी झाल्यास सोसायटी, संबांधित कार्यकारी मंडळ अथवा संस्थेचा कोणताही कार्यकर्ता जबाबदार असणार नाही याची प्रत्येक सदस्याने नोंद घ्यावी.  या ब्लॉग वरील माहितीशी सोसायटीचे कार्यकारी मंडळ सहमत असेलच असे नाही.

हा ब्लॉग फक्त टागोर नगर अमरज्योती को ऑप हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, बिल्डिंग क्र. २७, टागोर नगर, विक्रोळी (पूर्व), मुंबई ४०००८३ या संस्थेच्या सदस्यांच्या अंतर्गत / खाजगी माहितीसाठी मर्यादित असून यामध्ये कोणतीही माहिती विकण्याचा अथवा व्यावसायिक नफा कमावण्याचा उद्देश नाही. 


*********************************************************************************
This blog is created, managed and updated by
 

Last updated on 31st December 2020


Comments

Popular posts from this blog

सोसायटी फॉर्म्स

New Update

स्वागत